“डॉक्टर आपल्या दारी” महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी व निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने *
“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार एक दिवसीय *”फिरता दवाखाना”* ची सुरुवात केली आहे. शनिवार दि. 24-09-2022 रोजी *KLE. B.B.A.* या महाविद्यामध्ये मोफत रुग्णसेवा दिली. एकूण या दिवशी *60 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आले. ह्या सर्व 60 विद्यार्थी रुग्णांची संपूर्ण सेवा *सुजल मेहता व परिवार* ह्यांनी केली. सुजल मेहता यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये उपाध्यक्ष सतिश वखारीया, राजेश ओ. शहा, राजू शहा, राजू मेहता रितेश शहा, डॉ. राजेंद्र वखारिया व स्टाफ मेंबर्स हजर होते. हे शिबीर यशस्वी करणेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, स्टाफ मेंबर्स यांची मोलाची मदत मिळाली.