मास्क ग्रुप संचलित डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघाने केला डॉक्टर निखिल यांचा सत्कार.
———————————————————–
अक्कोळ येथील *डॉ. निखिल संजय पंतबाळेकुंद्री* यांनी नुकत्याच झालेल्या एम.डी. (मेडिसिन) पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महावीर आरोग्य सेवा संघाने आज दि. 22-12-2024 रोजी *डॉ. निखिल* यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
सत्कार सोहळ्यात संस्थेचे *अध्यक्ष प्रकाशभाई शहा* यांनी डॉ. निखिल यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटीचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, आपल्या कर्तुत्वाने आपण केवळ आपलेच नव्हे तर आपल्या कुटुंबाचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण समाजाचे नाव उज्वल केले आहे. आपल्या भविष्यातील वैद्यकीय कारकिर्दीसाठी आम्ही आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
संस्थेचे *उपाध्यक्ष सतीश वखारिया* यांनी डॉ. निखिल यांचा सत्कार करत त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली. यावेळी डॉ. निखिल यांचे वडील *डॉ. संजय पंतबाळेकुंद्री* यांचाही सत्कार संस्थेचे *विश्वस्त राजूभाई शहा* यांचे तर्फे करण्यात आला. सत्कार सोहळ्यात *मास्क ग्रुपनेही* डॉ. निखिल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे सर्व विश्वस्त डॉक्टर्स व स्टाफ उपस्थित होते.