*𝕄𝕒𝕤𝕜 𝔾𝕣𝕠𝕦𝕡* संचलित-
*डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.*
__________________________________
*”रुग्णसेवा सहयोग”*
“””””””””””””””””””””””””””””
*नाया साई रिशी पत्की, मुंबई.*
[डॉ. एम. ए. शहा, निपाणी. यांची नात.] यांनी आज दि. 20-05-2025 रोजी सेवार्थ दवाखान्यास रुग्णसेवेसाठी- ₹ 5,000/- [₹ पाच हजार देणगी दिली आहे.
निपाणी मधील *गोरगरिबांचे कैवारी डॉ. एम. ए. शहा* यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचार केले आहेत, त्यांचा रुग्णसेवा कार्याचा गौरव करीत त्यांचे नाव निपाणी पंचक्रोशीमध्ये आदराने घेतले जाते. आजही *डॉ. एम. ए. शहा* यांना देवदूत मानले जाते. त्यांना स्मरण करून त्यांची कन्या *राधिकाबेन प्रणव कुलकर्णी* यांनी निपाणी मधील सेवार्थ दवाखान्यामध्ये अत्याधुनिक तंत्र-सामुग्रीने सुसज्ज, सर्व सुविधा असणारा व निपाणी भागातील सर्व समाजातील गरजू रुग्णांना उच्च दर्जाची विविध वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेमध्ये आपल्याही परिवाराचे योगदान असावे ह्या उद्देशाने ह्या रुग्ण मंदिरात *₹ 5,000 /-* ची देणगी दिली आहे.
*”पत्की परिवाराने”* सेवार्थ देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवेच्या माध्यमातून सर्व स्तरावर सुकृत कार्य करून *”रुग्णसेवा सहयोग परिवार”* म्हणून ओळख निर्माण केली आहे.
आपण दिलेल्या देणगीचा रुग्ण व त्याच्या कुटुंबाचा *आशीर्वाद* आपणास नक्कीच मिळणार आहे.
*”पत्की” परिवाराचे सर्व विश्वस्ताकडून खूप-खूप आभार.*