*“डॉक्टर आपल्या दारी”*
*𝕄𝔸𝕊𝕂 𝔾𝕣𝕠𝕦𝕡* संचलित
*डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) निपाणी.
मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील रुग्णांना अत्यल्प दरात योग्य उपचार व रुग्णसेवा मिळावी या उद्देशाने “डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय “फिरता दवाखाना” ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 21-12-2024 रोजी *गायकनवाडी* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
*गायकवाडी* मध्ये ह्या दिवशी *52 रुग्णांना* मोफत आरोग्य व दंत तपासणी तसेच औषध उपचार करण्यात आला.
विश्वस्त *श्री सागर शहा* यांच्या नेतृत्वाखाली या रुग्णसेवेमध्ये उपाध्यक्ष सतीश वखारिया, रितेश शहा, सुजीत स्वामी, R. C. भैया, संदीप माने, सुरज राठोड, मिलिंद मेहता मेडिकल आँफीसर डॉ. रोहिणी पाटील, डॉ.ओंकार जाधव व स्टाफ हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी गायकनवाडीचे सरपंच श्री रवींद्र खोत व गायकनवाडी ग्रामस्थांची मोलाची साथ मिळाली.