*𝕄𝕒𝕤𝕜 𝔾𝕣𝕠𝕦𝕡* संचलित-
*डॉ.सौ.वैशाली & डॉ.विलास पारेख.*
*महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.*
__________________________________
*निपाणी येथे भव्य मोफत आरोग्य सेवा शिबिर संपन्न.*
*विद्यासंवर्धक मंडळ, निपाणी आणि डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ (सेवार्थ दवाखाना) निपाणी.* यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 06-02-2025 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 4:00 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात रुग्ण व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या दंत व आरोग्य सेवांचा लाभ घेता आला. *300 पेक्षा जास्त रुग्णांनी ओपीडी, दंत चिकित्सा आणि ब्लड चेकअपचा* लाभ घेतला.
महावीर आरोग्य सेवा संघाचे सर्व विश्वस्त, विद्यासंवर्धक मंडळ चे सभासद, *डॉ. सूरज मोरबाळे, डॉ. रोहिणी पाटील, डेंटल डॉ. कोमल जाधव* व स्टाफ, सिस्टर उपस्थित होते.
या शिबिरामुळे अनेक गरजूंना तसेच विद्यार्थ्यांना आरोग्य सेवांचा लाभ मिळाला अशी माहिती आयोजकांनी दिली. तसेच विद्यासंवर्धक मंडळ, निपाणी यांनी महावीर आरोग्य सेवा संघ चे आभार मानले.