*“डॉक्टर आपल्या दारी”*
*𝕄𝔸𝕊𝕂 𝔾𝕣𝕠𝕦𝕡* संचलित
*डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) निपाणी.
मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील रुग्णांना अत्यल्प दरात योग्य उपचार व रुग्णसेवा मिळावी या उद्देशाने
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 4-1-2025 रोजी *अंबलझरी* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
*अंबलझरी* मध्ये ह्या दिवशी *97रुग्णांना* मोफत आरोग्य व दंत तपासणी तसेच औषध उपचार करण्यात आला.
विश्वस्त *श्री बसवराज जडी* यांच्या नेतृत्वाखाली या रुग्णसेवेमध्ये उपाध्यक्ष सतीश वखारिया,सेक्रेटरी मिलींद मेहता रितेश शहा, सुजीत स्वामी, राजू मेहता, सागर शहा, सतीश श्रीप्पण्णावर , सुशांत खेडेकर मेडिकल आँफीसर डॉ. सुरज मोरबाले, डॉ.ओंकार जाधव व स्टाफ हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी अंबलझरी सरपंच व अंबलझरी ग्रामस्थांची मोलाची साथ मिळाली.