सुरुवातीला कट्ट्यावर बसून कट्टा ग्रुप तोही विविध छोट्या-मोठ्या कार्यातून नावरूपास आला. हळूहळू विचारसरणी बदलू लागली. समाजाचे ऋण ज्या समाजात जन्माला आलो आणि समाजाचं हे देणे का फेडावे लागले. कारण आपले संस्कार धर्म इतिहास हेच सांगतो की रुग्णसेवा करावी सर्वसामान्यांचे कल्याण व्हावे तरच आपण माणूस म्हणून श्रेष्ठ ठरतो हीच संकल्पना कट्ट्यावरून पुढे आली, या प्राथमिक संकल्पनेला मिलिंद मेहता यांनी जोर धरला हळूहळू हे सर्व कट्ट्यावरील मित्रांना पटत गेले. सुरुवातीला कोणताही रुग्णसेवेचा अनुभव नसताना मनात एक प्रकारची भीती होती पण वाढती महागाई अज्ञान आणि परिस्थितीशी दोन हात करता करता योग्य उपचाराअभावी निराश झालेले रुग्ण ही मोठी सामाजिक समस्या आहे हे सर्व कट्टा ग्रुपला मनापासून पटले अत्यंत अल्प दरात रुग्णसेवा द्यावी या उद्देशाने दि.7-5-2019 रोजी अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘बीज’ रोवले गेले .डॉ. अशोक भूपाली M D D M (CARD)(संस्थापक. APPLE हॉस्पिटल कोल्हापूर) FACC व डॉ. एम.डी.दीक्षित M.S.,D.N.B.,Ph.D.(CITS) सुप्रसिद्ध हृदय विकारतज्ञ अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला. आज जवळपास 9 महिने पूर्ण होत आहेत जवळपास 30000 रुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतला सर्व डॉक्टर, सेवार्थ दवाखान्याचा स्टाफ व विश्वस्तांनी अहोरात्र मेहनत करून हा सेवार्थ दवाखाना या भागात नावलौकिकास आणला आज या सेवार्थ दवाखान्यात 20 रुपयात औषधा सह रुग्णसेवा, 99 रुपयांमध्ये ECG अत्यंत अल्प दरात M.D.PATHOLOGIST डॉक्टर कडून रक्त ,लघवी व इतर तपासण्या होतात. जशी एखादी जीवनदायी नदी वाहत असताना काठावरच्या परिसराचं जीवन फुलविते त्याप्रमाणे या दवाखान्याने एक अद्वितीय अशी गरुड भरारी घेतली आहे आमच्या सेवेच्या कार्यात – उपाध्यक्ष सतीश वखारिया यांनी खूप वेळ देऊन अत्यंत ACTIVE अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या उचलल्या आहेत व आपला अमूल्य वेळ ते संस्थेसाठी आजही देत आहेत, तसेच संपदा मेहता निपाणी या रोज न चुकता संस्थेच्या पैशाचे दैनिक व्यवहार सांभाळत आहेत. सर्वच विश्वस्त तन-मन व एकजुटीने कार्य करत आहेत. संस्थेचे संस्थापक व बीज रोवणारे प्रमुख प्रसादभाई दोशी C A दुबईत राहूनही- निपाणी ही आपली कर्मभूमी, जन्मभूमी आहे म्हणून अत्यंत बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करून संस्था वाढीसाठी आपले योगदान देत आहेत. संस्थेचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र वखारिया यांनी ही संस्था मोठी करण्यासाठी व रुग्ण समाधानी राहण्यासाठी खूप कष्ट व मेहनत घेत आहेत रविवारीही हा दवाखाना चालू आहे लवकरच ही संस्था 80G व 12A साठी पात्र ठरेल संस्थेच्या सेवेसाठी पहिल्या वर्धापन दिनादिवशी रुग्णवाहिका सुद्धा सेवेत रुजू होत आहे. अशाप्रकारे 7-5-2019 रोवलेल्या या बीजाच एका वृक्षात रूपांतर होत आहे संस्था सुरू झाल्यापासून आजपर्यंत अनेक ज्ञात,अज्ञात ,दानदाता ,शुभचिंतक यांच्या प्रेमाने व सहकार्याने अनेक रुग्ण सेवा घेऊन समाधानी दिसत आहेत .सर्वांना धन्यवाद…
लवकरच संस्था स्वतःची नवीन वास्तू घेऊन एक चांगले हॉस्पिटल बनवणार
विश्वविख्यात डॉ. शरद शहा ,मुंबई GASTROLOGIST(पोट विकार तज्ञ) या संस्थेत ज्यावेळी येऊन भेट दिली त्यावेळी त्यांनी संस्थेची सर्व कार्य पद्धती बघितली व लगेच त्यांनी भरघोस देणगी देऊन संस्थेसाठी कधीही काहीही करण्याची तयारी दर्शवली लवकरच त्यांचा कॅम्प निपाणी भागात आमच्या सेवार्थ दवाखान्यातर्फे घेतला जाणार आहे असे हे सर्वांचे म्हणजे निपाणीचे लाडके जावई डॉ.शरद शहा यांनी संस्थेसाठी जे प्रेम दाखवले त्याबद्दल संस्था कायम त्यांची ऋणी आहे.