विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते हे केवळ ज्ञानदानापुरते मर्यादित नसून जीवन घडवणारे असते. शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाने विद्यार्थी मोठे होत समाजासाठी योगदान देतात, तेव्हा शिक्षणाची खरी फलश्रुती दिसते.
आज स्वर्गीय विठ्ठल दत्तात्रय पंगु व स्वर्गीय सुनिता विठ्ठल पंगु यांच्या प्रित्यर्थ प्रख्यात गणिततज्ञ अजित पंगु सरांनी आपल्या विद्यार्थ्यांनी उभारलेल्या
डॉ. सौ. वैशाली विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ
या दवाखान्यास भेट दिली.
विद्यार्थ्यांची प्रगती पाहून ते आनंदित झाले आणि अभिमानाने भारावून गेले. त्याच भावनेतून त्यांनी
₹ १,५१,०००/- ची उदार देणगी आपल्या स्वर्गीय आई-वडिलांच्या प्रित्यर्थ अर्पण केली.
सर, तुमच्या अमूल्य योगदानासाठी मनःपूर्वक आभार!
तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो!