Menu Close

एकच आस………. वाचविणे रुग्णांचे प्राण…….

*एकच आस………. वाचविणे रुग्णांचे प्राण.*
*?महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी (सेवार्थ दवाखाना)*रुग्ण सेवेसाठी दिवस-रात्र  सेवा-कार्य करीत आहे ह्याची प्रचिती पुन्हा एकदा निपाणीवासी यांनी एक थरारक घटनेत अनुभवली.       *संदीप भिमराव ढोले रा.. अर्जुनवाडा* यास अत्यावशक उपचाराची गरज होती व कोल्हापूर मध्ये उपचारा शिवाय पर्याय नव्हता.          मुसळधार पाऊस व महापुरामुळे सर्व रस्ते गेल्या 4 दिवसापासून बंद आहेत          रात्रीचे 12 ची वेळ, उपचाराची तातडीची गरज व कोल्हापूरचे रस्ते बंद ह्या मुळे नातेवाईक अतिशय चिंतेत होते सर्व ठिकाणी प्रयत्न केला पण कोल्हापूर साठी मदत मिळत नव्हती.त्यांनी महावीर आरोग्य सेवा संघ कडे मदतीसाठी मध्यरात्री संपर्क केला.              ?महावीर आरोग्य सेवा संघ ने क्षणाचाही विचार न करता तातडीची उपचारासाठी पुढे सरसावली       *24×7 सेवा* देणारी ? रुग्णवाहिका मधून 25 जून च्या मध्यरात्री रुग्णांला घेऊन कोणत्याही परिस्थितीत तातडीने उपचार मिळावे म्हूणन  रुग्णवाहिका ? चालक??‍♂️ *राहुल ताडे* यांनी रुग्णाला कोल्हापूरमध्ये उपचारासाठी कापशी माद्याळ पांगिरे,पाल मार्गे गारगोटी मुधाळतिट्टा कोल्हापूर हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करून रुग्णाला उपचारासाठी अति आवश्यक मदत केली.        *”मानव सेवा हीच ईश्वर सेवा”* हे ब्रीद वाक्य घेऊन सुरु केलेल्या महावीर आरोग्य सेवा संघचे सर्व विश्वस्थ्यांचे रुग्णांचे नातेवाईक यांनी खूप आभार व्यक्त केले.