*️ऑक्सिजन बँक ️*_______________________________
कोरोना महामारी च्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारतात अक्षरशः थैमान घातले आहे. अन्न पाणी व हवा याशिवाय माणूस जगू शकत नाही. ऑक्सिजन शिवाय माणूस काही मिनिटेही राहू शकत नाही. दुर्देवाने ज्या व्यक्तीला कोरोना ची लागण झाली आहे त्यांच्या शरीरात ऑक्सिजन कमी पडत आहे कृत्रिम ऑक्सिजन मशीन द्वारे रुग्णास ठराविक वेळ ऑक्सीजन दिल्यानंतर रुग्णांचा प्राण वाचत आहे. म्हणूनच भारतामध्ये सध्या ऑक्सिजन टंचाई जाणवत आहे. भविष्यात निपाणी भागात कोरोना रुग्णास ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून महावीर आरोग्य सेवा संघाने *5 Oxygen Concentrators मशीनची* सोय केली आहे. निपाणी भागात प्रथमच*सिंगापुरातील Yuwell कंपनीचे अत्याधुनिक* *9-F 5AW Oxygen Concentrators मशीन* उपलब्ध केले आहेत. महावीर आरोग्य सेवा संघाचे विश्वस्थ *संगीताबेन प्रसाद दोशी (चेअरमन आस्था सेवा फौंडेशन पुणे)* यांनी महावीर आरोग्य सेवा संघास हे *5 ऑक्सिजन मशीन* भेट दिली आहेत. ह्या सर्व ऑक्सिजन मशीनची अंदाजे किंमत जवळपास *3,00,000 रुपये* आहे. महावीर आरोग्य सेवा संघ अति आवश्यक अश्या कोरोना रुग्णांना हे *ऑक्सिजन मशीन* उपलब्ध करून देणार आहे. निपाणी भागात अत्याधुनिक पद्धतीचे *5 Oxygen Concentrators* उपलब्ध करून दिल्याबद्दल *संगिताबेन दोशी* यांचे खुप खुप आभार मानत आहे.