*कर्नाटक मायनॉरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (KMDC) चे डायरेक्टर तसेच कर्नाटक राज्याचे समस्त जैन संघ व संस्थाचे अध्यक्ष आदरणीय श्री गौतमजी जैन (दावणगेरे) यांनी महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी येथे दि. 20-3-2021 रोजी सदिच्छा भेट दिली.*
*त्यांच्यासोबत श्री. सुपार्श्वनाथ मूर्तिपूजक संघ दावणगेरे चे अध्यक्ष व उपाध्यक्ष, ट्रस्ट मंडळ व सु-श्रावक उपस्थित होते.*
*ह्यावेळी महावीर आरोग्य सेवा संघ तर्फे श्री गौतमजी बाफना तसेच सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले*
*सर्वांनी महावीर आरोग्य सेवा संघ निपाणीच्या संपूर्ण सेवा कार्याची माहिती जाणून घेतली. अध्यक्ष प्रकाशभाई शहा तसेच डॉ. राजेंद्र वखारिया,श्वेता गुजर, खुशबू बागवान यांचेकडून मानव सेवा कार्याचा आढावा जाणून घेतला.*
*या सर्वांनी महावीर आरोग्य सेवा संघाच्या सर्व विश्वस्तांचे कौतुक करून आपण जास्तीत-जास्त रुग्णसेवा देण्यासाठी शासनाकडून या संस्थेस अनुदान प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले तसेच पुढील सर्व कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.*