*महावीर आरोग्य सेवा संघ* *निपाणी.* ┄┅════❁❁════┅
*“कोरोनाची ही घडी* *दाखवली खरी माणुसकी”*
*♦️ सौ.स्नेहलता अशोक भाई मेहता यांच्या नावे अमेरिकास्थित आशिष मेहता यांचेकडून 50 हजार रुपयाची रुग्णसेवा.*______________________________
*”मानवता परमो धर्म”* ह्या संकल्पनेने सुरू केलेली *महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी* रुग्ण सेवेमध्ये नव-नवीन उच्चांक गाठत आहे. रुग्णसेवे बरोबरच *”माणुसकीचे दर्शन”* घडवित कोरोना काळात रोज गरजू लोकांना मोफत एक वेळचे जेवण देत आहे. भुकेल्या जीवांना आधार बनून मुक प्राण्यांची सुद्धा सोय करीत आहे. ह्या सर्व निस्वार्थ भावनेने करीत असलेल्या कार्याची दखल *साता-समुद्रापार* पोहोचली आहे. अमेरिकास्थित *श्री.आशिष अशोकभाई मेहता* (Global Infra Service, America) यांनी निपाणी *”मातृभूमीचे बंध”* आणि *सामाजिक बांधिलकीतून* आपल्या मातोश्री*सौ.स्नेहलता अशोक भाई मेहता* यांचे नावे *रु.50,000* देणगी दिली आहे. आजच्या या दुर्देवी घडी व अतिशय संकट काळात *मेहता परिवाराने* दिलेली मदत म्हणजे *मानवता धर्म व सामाजिक ऋण* फेडण्याबरोबरच गरजू रुग्णांना लाख-मोलाची मदत मिळणार आहे. मेहता परिवार,निपाणी *प्रत्येक वेळी मदतीचा हात* देऊन महावीर आरोग्यसेवा संघांमध्ये नवनवीन सेवाकार्य करण्यास संधी उपलब्ध करून देत आहे. *महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी* ह्या रुग्ण सेवा संस्थे दिलेल्या देणगीचा *रुग्ण व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद* आपणास नक्कीच मिळणार आहे. तसेच आपण दिलेली देणगी *मानव कल्याणासाठी* योग्य पद्धतीने खर्च करेल अशी ग्वाही देत आहे. तसेच *मेहता परिवाराचे* खूप-खूप आभारी आहे