डॉक्टर सौ. वैशाली व डॉक्टर विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखान्यात आज एक खास क्षण घडला. *कोल्हापूरचे सुप्रसिद्ध Cardiologist, डॉ. दिलीप आडनाईक* यांनी शुभेच्छा भेट दिली आणि दवाखान्याच्या सेवेचे भरभरून कौतुक केले.
त्यांनी या दवाखान्याच्या सेवाकार्याची प्रशंसा करत, पुढील काळात *हृदयविकारासंदर्भात अनेक सेवा मोफत देण्याचे मान्य केले आहे*. भविष्यात येणाऱ्या अनेक हार्ट प्रॉब्लेम्स साठी त्यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या या उदार कृतीमुळे दवाखान्याच्या कार्यात एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
महावीर आरोग्य सेवा संघाच्या सेवार्थ दवाखान्याला *डॉ. आडनाईक* यांचे सहकार्य मिळणे, हे खरोखरच एक अभिमानास्पद क्षण आहे. यामुळे अनेक गरजू रुग्णांना लाभ होईल व दवाखान्याचे कार्य आणखी बळकट होईल.