*जोल्ले उद्योग समूह यांचे कोविड सेंटरमध्ये महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी तर्फे रुग्णसेवेसाठी 3 Oxygen Concentrators Machine ची सोय.* “””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” निपाणी भागातील लोकप्रिय खासदार श्री.अण्णासाहेब जोल्ले व आमदार सौ.शशिकला जोल्ले यांनी निपाणी भागात कोरोना रुग्ण वाढत आहे याची तत्पर दखल घेऊन दि. 6-5-2021 रोजी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.
*महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी* दुसर्या वर्धापन दिनानिमित्त निपाणीतील रुग्णसेवेसाठी *सिंगापुरातील Yuwell co. चे अत्याधुनिक 9-फ 5AW Oxygen Concentrators* ची मोफत सोय केली आहे आज सकाळी ठीक 11:00 वा.वर्धापन दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑक्सीजन मशीनची पूजा करून करून रुग्णांच्या सहाय्यासाठी *जोल्ले उद्योग समूह या कोविड केअर सेंटर, समुदाय आरोग्य केंद्र निपाणी* या उपचार केंद्रात *3 Oxygen Concentrators मशीन* खा. आण्णासाहेब जोल्ले व तज्ञ डॉक्टर्स यांना सुपूर्द केले. महावीर आरोग्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री प्रकाशभाई शहा यांनी यावेळी सांगितले की आपल्या ह्या संस्थेमध्ये कोरोना रुग्णांना आमच्या संस्थेचे मशीन सुपूर्द करीत आहोत. आमच्या ह्या संस्थेसही रुग्णसेवेचा हातभार लावण्याची संधी प्राप्त करून दिली. तसेच भविष्यात आणखी रुग्णसेवेसाठी कोणतीही मदत हवी असल्यास आम्ही जरुर पूर्तता करण्याचा प्रयत्न करू. ऑक्सीजन मशीन कसे हाताळले जावे याबद्दल माहिती दिली. *खा. श्री.अण्णासाहेब जोल्ले* यांनी कोविड रुग्णांच्या उपचारासाठी *Oxygen Concentrators* मशीनची आवश्यकता होती ती आपण निस्वार्थ भावनेने मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल *आभार* व्यक्त केले. ह्यावेळी खा.श्री आण्णासाहेब जोल्ले, तज्ञ डॉक्टर्स, अध्यक्ष प्रकाश भाई शहा, उपाध्यक्ष सतीश वखारिया तसेच विश्वस्थ व जोल्ले उद्योग समूहाचे कर्मचारी उपस्थित होते.