“डॉक्टर आपल्या दारी”?*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे. निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने*?⚕”डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय*“फिरता दवाखाना”*ची सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात बेनाडी,पट्टणकूडी,कोडणी ह्या ग्रामीण भागानंतर आज शनिवार दि. 13-03-2021 रोजी *अंम्मलझरी* गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली. *अंमलझरी* मध्ये ह्या दिवशी *88 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला. *अंमलझरी* ह्या ग्रामीण गावांमध्ये एकही दवाखाना तसेच औषध दुकान नाही. ह्या गावातील नागरिकांना औषध उपचारासाठी थेट निपाणी मध्ये यावे लागते. वयोवृद्ध व आबाल रुग्णांना उपचारासाठी येणे फारच कठीण जाते. *महावीर आरोग्य सेवा संघ* ह्या रूग्णांची उपचाराची सोय व्हावी म्हणून *एक दिवसीय आरोग्य शिबिर* ची सोय केली. ह्या आरोग्य शिबिर मध्ये *अंम्मलझरी* ह्या गावातील रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दिला. रुग्णसेवा शिबिर पार पाडल्यानंतर *अंम्मलझरी* गावातील नागरिकांनी उस्फूर्तपणे महावीर आरोग्य सेवा संघाचा सत्कार केला. ह्यावेळी अध्यक्ष प्रकाशभाई शहा यांनी वेळेअभावी मर्यादित रुग्णसेवा झाली म्हणून पुन्हा एकदा आरोग्य शिबिर घेण्याचे जाहीर केले. हा आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महावीर आरोग्य सेवा संघाचे विश्वस्त *सुरज राठोड* तसेच *अंम्मलझरी* गावातील तरुण मंडळ व नागरिकांनी यशस्वी साथ दिली.