*?⚕”डॉक्टर आपल्या दारी”?⚕*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे. निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने*?⚕”डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय*“फिरता दवाखाना”*ची सुरुवात केली आहे. आज शनिवार दि. 27-03-2021 रोजी *पडलीहाळ* गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली. *पडलीहाळ* मध्ये ह्या दिवशी *77 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला. *पडलीहाळ* गावातील ग्रामस्थांना *मास्क ग्रुप* ने दिलेली अल्पदरात रुग्ण सेवेबद्दल विश्वस्तांचे स्वागत करून सांगितले की आमच्या गावां मध्ये एकही दवाखाना तसेच औषध दुकान नाही.आबाल व वयोवृद्ध रुग्णांना औषध उपचारासाठी खूपच परवड होते आपण दिलेल्या या रुग्ण सेवेबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहे असे भावनिक उदगार व्यक्त केले. हा आरोग्य शिबिर यशस्वीपणे व सुयोग्य नियोजनाने पार पाडल्याबद्दल महावीर आरोग्य सेवा संघाचे विश्वस्त *जितेंद्र शहा, शैलेश शहा, अध्यक्ष प्रकाश शहा, डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफ* यांचा सत्कार केला. जितेंद्र शाह व शैलेश शहा यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये प्रकाश शहा, प्रतीक शहा, राजेंद्र मेहता, सुजल मेहता, सुशांत खेडेकर, संदीप माने, रितेश पी. शहा, रितेश व्ही शहा, प्रशांत शहा, व पडलिहाळ गावातील नागरिक उपस्थित होते.