महावीर आरोग्य सेवा संघ.* *निपाणी* ══━━━✥✥━━━══ *डॉ. श्री किसनलालजी सोगमलजी ओसवाल**(Oswal Clinic, Bangarpeth, Bangalore)* (अध्यक्ष प्रकाशभाई व जवाहारभाई यांचे जिजाजी.) यांनी आज शनिवार दि. 26-12-2020 रोजी महावीर आरोग्य सेवा संघ या संस्थेस सदिच्छा भेट दिली. *MASK Group* या संस्थेने केलेल्या आज पर्यंतच्या संपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता फक्त *मानव सेवा* देण्याच्या उद्देशाने सुरु केलेली संस्थेबद्दल त्यांनी खूप खूप आभार व्यक्त केले. *मास्क ग्रुप* चे मेडिकल ऑफिसर डॉ. श्री राजेंद्र वखारिया यांचेशी रुग्ण सेवा बद्दल एकमेकाशी संवाद साधला. *मानव सेवा हीच ईश्वर सेवा* ह्या वचनाची जाणीव असणारे *डॉ. किसनलालजी* यांनी *MASK Group* ने केलेल्या कार्याची दखल घेऊन व भविष्यात अशीच रुग्ण सेवा अखंडीत सुरु राहावी या उद्देशाने *₹ 51000* /-रोख स्वरूपात देणगी दिली. *डॉ.श्री किसनलालजी* हे आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा अतिशय अल्प दरात रुग्णसेवा जवळपास *41 वर्षापासून* देत आहे *महावीर आरोग्य सेवा संघ* या संस्थेस आपण दिलेल्या देणगीचा उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी नक्कीच उपयोग होणार आहे. आपण दिलेल्या मौलिक सल्ला तसेच सदिच्छा भेट मुळे *MASK Group* चे मेडिकल ऑफिसर व सर्व विश्वस्थांना नक्कीच उपयोग होणार आहे. *महावीर आरोग्य सेवा संघ डॉ.श्री किसनलालजी ओसवाल यांचे खुप-खूप आभार.*