*भूषण विहार सेवा ग्रुप* साधू-साध्वीजी च्या विहार सेवा बरोबरच साधू-साध्वीजी वेय्यावच्च व जैन समाजातील बरेच धार्मिक कार्य करीत आहेत. सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने निपाणी भागात *ऑक्सिजनची* खूपच आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी निपाणी भागातील रुग्णासाठी *विहार ग्रुपने* नवीन सामाजिक उपक्रम राबवत *1-Oxygen Concentrators Machine* उपलब्ध करून महावीर आरोग्य सेवा संघास विनंती केली की आपण हे *Oxygen Concentrators Machine* निपाणी भागातील रुग्णांसाठी मोफत उपचारासाठी देऊन आम्हास ही *रुग्ण सेवेची संधी* उपलब्ध करून द्यावी. ह्यावेळी विहार ग्रुपचे अध्यक्ष स्वप्निलभाई शहा महावीर आरोग्य सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा उपाध्यक्ष सतीश वखारिया व ग्रुप मेम्बर्स उपस्थित होते.