*महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी रुग्णसेवेची कार्य तत्परता-* _____________________________ आज बुधवार दि. 03-03-2021 रोजी दोनप्रहरी 1:00 दरम्यान मोटर सायकल व बस यांचा अपघात जुना पि.बी.रोड, कॅमल हाऊस जवळ घडला. मोटर सायकल स्वार गंभीर जखमी अवस्थेत पडून होता. बघ्यांची भरपूर गर्दी जमली होती. त्यातील एक कर्तव्यदक्ष नागरिकाने मोबाईल द्वारे सरकारी ॲम्बुलन्स 108 ला फोन केला. पण वेळे अभावी ॲम्बुलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. निपाणीतील खाजगी रुग्णालयात ॲम्बुलन्स ची चौकशी केली पण त्यावेळी ॲम्बुलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. *महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी* या संस्थेस ज्या वेळी या अपघाताची बातमी समजली त्यावेळी ॲम्बुलन्स ड्रायव्हर उपलब्ध नसताना सुद्धा *MASK Group* चा संचालक *श्री प्रतिक शहा* याने स्वतः *ॲम्बुलन्स* मध्ये चालक स्वरूपात आपले मानवतेचे कर्तव्य पार पाडत अपघात स्थळी पोहोचला व जखमी रुग्णास ताबडतोब *ॲम्बुलन्स* मध्ये घेऊन महात्मा गांधी निपाणी या सरकारी रुग्णालयात दाखल करून मानव सेवेचे कार्य पार पाडले.