महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी अन्नदान चा स्तुत्य उपक्रम.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*अन्न हेच परब्रम्ह.*
*अन्नदान हेच श्रेष्ठदान.*
~~~~~~~~~~~~~~~~~~
कोरोना रोगाचा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने
लॉक डाऊन जाहीर केले आहे. ह्या लॉक डाऊन मुळे निपाणी शहरात सर्व सामान्यांचा रोजगार नाहीसा झाला आहे. गरिबांना एक वेळचे जेवण पण मिळणे मुश्किल झाले आहे. अनाथ व्यक्तींना हॉटेलचा सहारा होता पण तोसुद्धा बंद झाला आहे. अशा लोकांना अन्न व पाण्याची सोय व्हावी ह्या साठी
महावीर आरोग्य सेवा संघाने* अन्न दानाची सोय केली.
निपाणी व परिसरामध्ये गरीब, बेघर तसेच भुकेले व्यक्ती तसेच झोपडपट्टी मध्ये जेवण देऊन समाजसेवेची मनापासून आवड असणारा *मास्क ग्रुप* पुण्य कार्य करत आहे.
ह्या संस्थेचे सभासद रोज संध्याकाळी शुद्ध व सात्विक भोजन चे 30 ते 40 डबे भरून गरजू लोकांना देत आहेत.
आजच्या ह्या कठीण परिस्थितीत वैध्यकीय सेवे बरोबरच अन्नदान चे
कार्य महावीर आरोग्य सेवा संघ चे विश्वस्थ अन्नदानाची जबाबदारी यशस्वी पार पाडीत आहे.