महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी यांचेकडून रोगप्रतिकारशक्ती व पौष्टिक औषधाचे वितरण.*————————————————- निपाणी भागातील कोरोना रुग्णांना औषध व उपचार *महात्मा गांधी रुग्णालयात* मोफत केले जात आहेत. डॉक्टर व नर्सिंग स्टाफ दिवस रात्र रूग्णांची योग्य सेवा देऊन रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निपाणी महात्मा गांधी रुग्णालयातील रुग्णांना कोरोना लवकर बरा होण्यासाठी तसेच कोरोना नंतर जी शारीरिक हानी झाली असते ती लवकर भरून निघणेसाठी *महावीर आरोग्य सेवा संघाने* प्रोटिन व मल्टीविटामिन युक्त *पौष्टीक औषधाचे* ह्या रुग्णांना मोफत वितरण करण्यात आले.
*Maxit-C* कंपनीचे The Best Nutritional Supplement (With protein, multi vitamins minerals anti oxidants powder) *₹7500/-* किमतीचे *30 बॉटल* महात्मा गांधी रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर *डॉ.सीमा गुंजाळ* यांना महावीर आरोग्य सेवा संघातील विश्वस्तांनी सुपूर्द केले.