*?”डॉक्टर आपल्या दारी”?*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे. निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने*?⚕”डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय*“फिरता दवाखाना”*ची सुरुवात केली आहे. आज शनिवार दि. 20-03-2021 रोजी *रामपूर* गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली. *रामपूर* मध्ये ह्या दिवशी *55 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला. *रामपूर* ह्या ग्रामीण गावांमध्ये एकही दवाखाना तसेच औषध दुकान नाही. ह्या गावातील नागरिकांना औषध उपचारासाठी थेट निपाणी मध्ये यावे लागते. आबाल व वयोवृद्ध रुग्णांना उपचारासाठी येणे फारच कठीण जाते. *महावीर आरोग्य सेवा संघ* ह्या रूग्णांची उपचाराची सोय व्हावी म्हणून *एक दिवसीय आरोग्य शिबिर* ची सोय केली. हा आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महावीर आरोग्य सेवा संघाचे विश्वस्त *पारस तलाठी* तसेच *रामपूर* गावातील तरुण मंडळ व नागरिकांची साथ मिळाली.Attachments area