*”मानव सेवा हीच ईश्वर सेवा”* या धर्तीवर सुरु केलेली *महावीर आरोग्य सेवा संघ* या संस्थेस आज दि.3-5-2021 रोजी माननीय *PSI अनिता राठोड* यांनी सदिच्छा भेट दिली. कोरोना महामारी काळातही 24×7 अखंड सेवा 3 मेडिकल ऑफिसर सह स्टाफ मेंबर्स व रुग्णवाहिकेच्या कार्याची संपूर्ण माहिती *PSI अनिता राठोड* यांनी जाणून घेतली. PSI अनिता राठोड यांनी सांगीतले की अत्यल्प दरात सुरू केलेल्या या संस्थेबद्दल आम्ही भरपूर ऐकले होते. आम्ही आपल्या संस्थेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी वेळात वेळ काढून आलो आहोत. महावीर आरोग्य सेवा संघ करीत असलेल्या सामाजिक कार्याची खूप प्रशंसा करुन भावी काळात सरकारी किंवा इतर कोणत्याही वेळी आम्ही मदतीसाठी तयार आहोत असे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा उपाध्यक्ष सतीश वखारिया,विश्वस्त तसेच मेडिकल ऑफिसर उपस्थित होते.