*श्रीमान शा.शशिकांतभाई भाईचंद शहा,निपाणी यांचेकडून महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी या रुग्ण संस्थेस रुग्णसेवेसाठी ₹51000/- देणगी.* ┄┅════❁❁════┅ मानव सेवा हीच ईश्वर सेवा तसेच जनकल्याणासाठी स्थापन झालेल्या महावीर आरोग्य सेवा संघ या संस्थेमध्ये*♦️मातोश्री अ.सौ.रतनबाई व श्रीमती कुंकूबेन भाईचंद शहा* यांचे स्मृतिप्रीत्यर्थतसेच*?श्रीमान शा. शशिकांतभाई भाईचंद शहा (अक्कोळकर)*यांचे वाढदिवसा निमित्त रुग्णसेवेसाठी *रु.51000* /- देणगी दिली आहे. समाजात अनेक जण विविध क्षेत्रात पारंगत असतात त्यातील क्वचितच दुसऱ्यांच्या सुखी जीवनासाठी जगणारे व त्यातच आपले सुख मानून गरजवंतांना आर्थिक व मौलिक मार्गदर्शन रुपी मदत करणारे आपल्यासारखे खूपच कमी असतात.
जीवनातील भौतिक सुख बाजूला ठेवून आपल्या दैनंदिन जीवनातील विविध प्रसंग आपल्या आप्तपरिवार मधील अनेक शुभकार्य यानिमित्त आपण जनसेवेसाठी देणगी देऊन सर्व स्तरावर एक *आदर्श* निर्माण केला आहे. आपण आपल्या *मातोश्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ* केलेली रुग्णसेवा सर्वांना हेवा वाटावी अशी आहे तसेच त्यांना खरी *श्रद्धांजली* मिळणार आहे. श्री शशिकांतभाई आपण निपाणी भागात यशस्वी उद्योजक व समाजामध्ये यशस्वी मार्गदर्शक म्हणून आपली ख्याती फार मोठी आहे. महावीर आरोग्य सेवा संघामध्ये आपला मौलिक सल्ला नक्कीच नवी उंची गाठत आहे. अक्कोळकर परिवार महावीर आरोग्य सेवा संघामध्ये सतत मदतरुपी देणगी देत असतात. आपण रुग्णसेवेसाठी दिलेल्या *₹51000/-* देणगीमुळे रुग्ण व रुग्ण परिवारांना आर्थिक बचत होणार आहे. व त्या सर्व रुग्णांचा व परिवारांचा *आशीर्वाद* आपणास नक्कीच मिळणार आहे. महावीर आरोग्य सेवा संघ *श्री शशिकांत भाईचंद शहा* यांचे *खूप-खूप आभारी* आहे तसेच आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.