*महावीर आरोग्य सेवा संघ* *निपाणी.* ┄┅════❁❁════┅ *
♦️श्री.आशुतोष & सौ. शर्वरी कुलकर्णी यांचेकडून माणुसकीचे दर्शन; रुग्णासाठी औषध रुपी मदत.*•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी निस्वार्थपणे अहोरात्र रुग्णसेवा देत आहे. कोरोना महामारी च्या काळात सुद्धा व अन्य आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना फक्त वीस रुपयांमध्ये केसपेपर, रुग्ण तपासणी व तीन दिवसाचे औषध देत आहे. सध्याच्या महागाई काळातही महावीर आरोग्य सेवा संघ कमीत कमी रुपयात इंजेक्शन,सलाईन, औषध उपचार तसेच इतर वैद्यकीय सेवा (Lab test, x-ray) ई. सेवा गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून पुरवीत आहे. या सर्व रुग्णसेवा कार्याची दखल घेऊन *♦️श्री.आशुतोष व सौ.शर्वरी कुलकर्णी.* *Airmid Health Tech Pvt. Ltd.* *शिरगाव,बदलापूर (ठाणे)* यांनी *“लाख-मोलाची औषध बँक”* रुपी *₹125000/-* हून अधिक किमतीचे औषधे मोफत पुरवली आहेत. पट्टणकुडी ह्या छोट्या गावातून *कुलकर्णी परिवार* व महावीर आरोग्य सेवा संघ मधील विश्वस्तांचे बालपणीचे मित्र—व हे मित्र करीत असलेल्या रुग्णसेवेसाठी आपलाही हातभार लाभावा व्हावा ह्या उद्देशाने *कुलकर्णी परिवाराने* मदतीचा हात दिला आहे.
आपण दिलेल्या *रु.एक लाख पंचवीस हजार रुपयांहून* अधिक औषधामुळे रुग्णांना *आर्थिक बचत* तर होणारच आहे त्याचबरोबर रुग्णांना उपचारासाठी *योग्य मदत* मिळणार आहे ह्या सर्व रुग्णांचा व रुग्ण परिवारांचा *आशीर्वाद* आपणास नक्कीच मिळणार आहे.
*महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.* *”कुलकर्णी परिवाराचे” खूप-खूप आभारी आहे.*