*श्री प्रभाकर चव्हाण,निपाणी परिवार यांचेकडून महावीर आरोग्य सेवा संस्थेस पाच गुंठे जमिनीचे मोफत हस्तांतर.* ┄┅════❁❁════┅
निपाणीत अल्पावधीतच लोकप्रिय झालेली रुग्ण संस्था महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी या संस्थेस *श्री प्रभाकर बाबुराव चव्हाण.**(सी प्रभाकर चव्हाण पेंटर) निपाणी. सध्या रा. प्रतिभा नगर,कोल्हापूर.*(महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी चे विश्वस्थ श्री. सुगम चव्हाण सर यांचे माता व पिता.) यांचेकडून रुग्ण सेवेसाठी निपाणी पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरील रामपूर क्रॉस जवळील *5 गुंठे* जमीन मोफत दिली आहे. *श्री.चव्हाण* यांनी मातृभूमीचे ऋण फेडणे व सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून रुग्णसेवेसाठी विश्वासात प्राप्त ठरलेली, *”मानव सेवा हीच खरी ईश्वर”* सेवा हे ब्रीद घेऊन सुरू झालेली संस्थेस *जमीन दान* देऊन अतिशय मौलिक योगदान दिले आहे महावीर आरोग्य सेवा संघाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे योगदान देणारे *चव्हाण कुटुंबीय* प्रथम ठरले आहे. येणार्या भविष्यकाळात या जमिनीचा समाजसेवा,मानव सेवा,रुग्णसेवा असे अनेक पुण्य कार्य या जमिनीत होणार आहेत. ह्याचा आशीर्वाद आपणास व आपल्या परिवारास मिळणार आहे. महावीर आरोग्य सेवा संघ आपण दिलेल्या जमिनीचा अत्यंत चांगल्या सु-नियोजन पद्धतीने उपयोगात आणून आपण दिलेले हे *”पुण्यवान दान”* येणाऱ्या भविष्यकाळात पिढ्यानपिढ्या आठवणीत काढतील याची आम्ही ग्वाही देतो. तसेच आपण दिलेले हे *”भू-दान ऋण”*आम्ही कदापिही विसरणार नाही. महावीर आरोग्य सेवा संघ *चव्हाण परिवाराचे शतशः आभारी आहे.*