निपाणी
*समुदाय कोविड सेंटर निपाणी*
चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय *खासदार आदरणीय अण्णासाहेब जोल्ले व महिला आणि बालकल्याण मंत्री सौ शशिकला जोल्ले* यांच्या प्रेरणेतून समुदाय आरोग्य केंद्र- *जोल्ले कोविड उपचार केंद्रामध्ये* *महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी* यांच्या वतीने कोरोना रुग्णांच्या विनंतीवरून *दुसऱ्यांदा* रूग्णांन साठी *मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन* करण्यातआले होते. हा कार्यक्रम रूग्णांच्या बरोबर येथे काम करणार्या करोना योध्दांच्या मानसिक आरोग्यामध्ये बद्दल करण्यासाठी महत्वाचा ठरला.या कार्यक्रमाच्या वेळी भावगीत, देशभक्ती गीत व हिंदी मराठी चित्रपटातील गीतातुन सर्व गायकांनी सर्व रूग्णांची मने जिंकली. रूग्णांनी यावेळी नाचून आनंद व्यक्त केला. त्यांचा वाढलेला आत्मविश्वास पहाण्या सारखा होता. या कार्यक्रमासाठी *महावीर आरोग्य सेवा संघाचे अध्यक्ष मा.प्रकाशभाई शहा जी उपाध्यक्ष सतीश वखारिया जी व प्रतीक शहा जी* व मास्क संघाच्या पदाअधिकार्यानी अथक परिश्रम घेतले.