*?राष्ट्रीय डॉक्टर दिन-2021निमित्त महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी मधील डॉक्टर्सना मानपत्र देऊन सत्कार.*
*1 जुलै-राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या* महावीर आरोग्य सेवा संघ मधील अध्यक्ष प्रकाशभाई शहा व उपाध्यक्ष सतीश वखारिया यांनी सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे असे सांगून आपल्या सर्व डॉक्टर्स मुळेच *90,000 हून अधीक रुग्णांची रुग्णसेवा* करू शकलो अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. मागील दीड वर्षांपासून सगळे कोरोनाच्या संसर्गाला सामोरे जाताना वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारीही अधिक वाढली आहे. आजपर्यंत कोविडचा लढा आपण लढलो ते तुम्हा डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या योद्ध्यांमुळे, आणि पुढेदेखील हे आव्हान आपण पेलणार आहोत ते आपल्याच भक्कम साथीने असा विश्वास सर्व विश्वस्थानी व्यक्त केला महावीर आरोग्य सेवा संघ मधील *डॉ. राजेंद्र वखारिया, डॉ. खुशबू बागवान, डॉ. श्वेता गुजर* यांनी जीवाची बाजी लावून आलेल्या प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले त्याबद्दल महावीर आरोग्य सेवा संघ नेहमी आपला *सदैव कृतज्ञ राहील* असे उदगार सर्व विश्वस्तांनी व्यक्त केले. आपल्या हाताला संजीवन स्पर्शाची जादू रोज गवसावी आणि तुमच्या हातून असंख्य जीव बरे व्हावेत, हीच *डॉक्टर्स दिनानिमित्त शुभेच्छा.* महावीर आरोग्य सेवा संघ मधील सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करून पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन डॉक्टरांच्या योगदानाचा MASK Group चे *अध्यक्ष श्री प्रकाशभाई शहा* यांनी सन्मान केला. ह्यावेळी महावीर आरोग्य सेवा संघ मधील सर्व विश्वस्थ उपस्थित होते