आज निपाणी येथील रोटरी हॉल येथेइनर व्हील क्लब व रोटरी क्लब-निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने निपाणी व परिसरातील काहीं डॉक्टरानी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आज ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला. अकोळ येथील डॉ संजय पंतबाळेकुंद्री, डॉ. सौ.श्रद्धा पंतबाळेकुंद्री, निपाणी येथील डॉ.दीपक व सौ संगीता देशपांडे, महावीर आरोग्य सेवा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वखारिया व डॉ.श्वेता शहा यांचा रोटरी सेक्रेटरी, व इनरव्हील क्लब अध्यक्ष यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या समारंभास निपाणी येथील इनरव्हील चे सदस्य रोटरी क्लबचे सदस्य व परिवार उपस्थित होते. नव्याने येऊ घातलेला कोरोनाव्हायरस बद्दलची संपूर्ण माहिती ,घ्यावयाची काळजी, लसीकरणाचे फायदे, यापुढेही कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज राहावे असे आव्हान डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांनी आपल्या प्रबोधनपर भाषणात व्यक्त केले.