*भुकेल्या जीवांचा आधार बनला* …… *महावीर आरोग्य* *सेवा संघ* ━━◆━━━━━◆━━━━━◆━━━ कोरोना या संसर्गजन्य महमारीच्या दुसऱ्या लाटेचा विळखा दिवसागणिक वाढतच आहे. याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने लॉकडावुन घोषित केले.
या लॉकडावुन चा सर्वाधिक फटका हा गरीब, निराधार, निराश्रित, व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना बसतो आहे.परिस्थिती मुळे हतबल झालेले अनेक गोर गरीब लोकांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होत होती.
रस्त्यालगत राहून आपली गुजराण करीत असणारे लोक, खायला कोंडा अन नीजेला धोंडा अशी ज्यांची परिस्थिती आहे अशा लोकांकरिता कायम सामजिक कामात अग्रेसर महावीर आरोग्य सेवा संघ काम करते आहे.
अशा लोकाकरिता रोजच्या जेवणाचे १०० डबे ,ज्या मध्ये सात्विक आहार समाविष्ट आहे असे रुचकर जेवण त्यांच्यापर्यंत मोफत पोहोचवण्याचं काम महावीर आरोग्य सेवा संघ ही संस्था निःस्वार्थी पणें करत आहे. रोजच्या जेवणाबरोबर या निराधार लोकांना मोफत ब्लँकेट ही महावीर आरोग्य सेवा संघाने पुरवले आहेत.
मानवी जीवन जितके अनमोल आहे तितकेच ते मुक्या प्राण्यांचे ही आहे.शहर परिसरातील मुक्त व भटक्या प्राण्यांची ही उपासमार या काळात होत होती महावीर आरोग्य सेवा संघाने या प्राण्यांची दूध- बिस्किटाची सोय केली आहे.
मागील वर्षापासून सुरू असलेला हा अन्नदानाचा उपक्रमयाही वर्षी महावीर आरोग्य सेवा संघाने जोमाने चालु ठेवला आहे.
या कार्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा, उपाध्यक्ष सतीश भाई वखारिया यांच्या बरोबर विश्वस्त अविराज शहा, आनंद शहा, सुजल शहा, अनुप शहा, अविनाश गुजर यांचा मोलाचा सहभाग आहे