Covid Free Village.
Government of Karnataka, भारतीय जैन संघटना [BJS] व महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी ह्यांच्या संयुक्त भागीदारीतून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या रक्षणासाठी व येणाऱ्या संभाव्य सामाजिक व आर्थिक हानीच्या रक्षणासाठी तसेच रोग मुक्तीसाठी संपूर्ण कर्नाटकामध्ये covid free village हा उपक्रम राबविला जाणार आहे. कर्नाटक सरकार तसेच भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्यातील एक मात्र निस्वार्थ सेवा देणारी संस्था महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी या संस्थेस बेळगाव जिल्हा व निपाणी तालुका या ग्रामीण विभागामध्ये उपक्रम राबवण्यासाठी आमंत्रित करून सोमवार दि.18-10-2021 Master Trainer द्वारे उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले, कोरोना पासून बचावासाठी रणनीती आखली गेली. भारतीय जैन संघटनेचे सर्वेसर्वा श्री शांतीलालजी मुथा यांनी निपाणी तालुक्यातील सर्व ग्रामीण भागांमध्ये येणाऱ्या महामारी पासून बचावासाठी सुनियोजित मांडणी बाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य, तहसीलदार,तलाठी,सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स व कर्मचारी तसेच महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी ह्यांना योग्य प्रशिक्षण देऊन कोरोना काळात घ्यावयाची काळजी, जिम्मेदारी, मुख्य प्रशिक्षण लवकरच देऊन प्रत्येक व्यक्तीस आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न ह्या Covid Free Village माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख N.G.O. सदस्य उपस्थित होते. Covid free village ह्या कार्यक्रमा दरम्यान श्री शांतीलालजी मुथा यांनी महावीर आरोग्य सेवा संघ च्या सभासदांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता.