*डॉ. सदानंद पाटणे (नेत्ररोग तज्ञ) गडहिंग्लज/निपाणी यांची महावीर आरोग्य सेवा संघ [सेवार्थ दवाखाना] मध्ये सदिच्छा भेट.*
———————————————
आज गुरुवार दि. 16-11-2023 रोजी निपाणी भागातील एकमेव सेवार्थ दवाखाना *महावीर आरोग्य सेवा संघ* चे कार्य पद्धत जाणून घेणे व नूतन निर्माणधीन पाच मजली इमारती बांधकामात सल्ला देणेसाठी *”अंकुर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल व नेत्ररोपण केंद्र” मधील तज्ञ डॉ. सदानंद पाटणे* ह्यांनी भेट दिली. ह्या भेटी दरम्यान डॉ. राजेंद्र वखारिया, डॉ. श्वेता गुजर ह्यांच्या सोबत अनेक वैद्यकीय विषयावर चर्चा करून मार्गदर्शन केले, अध्यक्ष प्रकाशभाई, उपाध्यक्ष सतीश वखारिया व विश्वस्त सोबत अनेक विषयावर गप्पा, जुन्या आठवणी सोबतच गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून नेत्र उपचार व अनेक रुग्णांना नवीन दृष्टी प्राप्त करून दिल्याबद्दल आभार व कृतज्ञता व्यक्त केली
डॉक्टर सदानंद पाटणे यांनी महावीर आरोग्य सेवा संघाचे सामाजिक कार्य पाहून आपणही लवकरच *आपल्यासोबत “मोफत नेत्र शिबिर”* घेऊन सामाजिक कार्यात सहभागी होऊ असे जाहीर केले.