*”डॉक्टर आपल्या दारी”*
*𝕄𝔸𝕊𝕂 𝔾𝕣𝕠𝕦𝕡* संचलित
डॉ.सौ.वैशाली व डॉ.श्री विलास पारेख
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने
*”डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय “फिरता दवाखाना” ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 09-11-2024 रोजी *गवाणी* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
*गवाणी* मध्ये ह्या दिवशी *108 रुग्णांना मोफत आरोग्य व दंत तपासणी औषध उपचार करण्यात आला.
विश्वस्त *श्री रितेश शहा* यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये सुजीत स्वामी, जवाहर शहा, सागर शहा, प्रतिक शहा, सुगम सर,वैभव कंगळे,राहूल कोठारी, राजू गुजर मेडिकल आँफीसर डॉ. खुशबू बागवान, डॉ. ओंकार जाधव, व स्टाफ हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी अध्यक्ष प्रकाश शहा व उपाध्यक्ष सतीश वखारीया व गवाणी ग्रामस्थांची मोलाची मदत मिळाली.