*निपाणीत प्रथमच गुंतागुंतीची दंत शस्त्रक्रिया यशस्वी.*
———————————————————–
*डॉ. सौ वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी* या सेवार्थ दवाखाना मधील *शांती-लीला डेंटल हॉस्पिटल* या दंत विभागात निपाणीतील एका 45 वर्षीय महिलेवर *Alveloplasty* (एल्व्हिओलोप्लास्टी) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या महिलेच्या जबड्यात हाडांचे काही अतिरिक्त भाग वाढले होते ज्यामुळे त्यांना अन्न चावणे व गिळणेस त्रास होत होता. दंतशल्यचिकित्सक (Oral surgeon) *डॉ. जिनेश्वर पाटील, गोल्ड मेडलिस्ट डॉ. कोमल जाधव आणि डॉ. ओंकार जाधव* यांनी शस्त्रक्रिया करून ते अतिरिक्त हाड काढून टाकले.
*Alveloplasty* ही एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे, जी जबड्याचे हाड व्यवस्थित केले जाते. या शस्त्रक्रियेत जबड्याच्या हाडांचा आकार बदलला जातो किंवा अतिरिक्त हाड काढून टाकले जाते. *Alveloplasty* चा उपयोग जबड्याच्या हाडांना योग्य आकार देण्यासाठी, दातांच्या कार्याला मदत करण्यासाठी आणि कृत्रिम दात बसवण्यासाठी केला जातो.
महावीर आरोग्य सेवा संघाने प्रथमच ती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडून निपाणीच्या वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे निपाणी आणि आसपासच्या भागातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. त्यांना आता अशा प्रकारच्या शस्त्रक्रियासाठी बेळगाव किंवा कोल्हापूर जाण्याची गरज भासणार नाही.
*महावीर आरोग्य सेवा संघातील संचालक सर्व डॉक्टर्स कर्मचारी यांनी डॉ. कोमल, डॉ. ओंकार जाधव व डॉ. जिनेश्वर पाटील यांचे अभिनंदन केले.*