मनःपूर्वक आभार व हार्दिक शुभेच्छा!
श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी यांनी ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त “डॉक्टर सौ. वैशाली विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना” या सेवाभावी संस्थेच्या कार्याची दखल घेत सत्कार केला, ही अत्यंत गौरवाची बाब आहे.
संस्थेचे ट्रस्टी माननीय प्रकाशभाई शहा, सतीश वखारिया, राजेश चंद्रकांत शहा, रितेश वी. शहा आणि सुरज राठोड यांचा सन्मान करत, त्यांनी या दवाखान्याच्या पाच वर्षांच्या अथक सेवेस मान्यता दिली, याबद्दल मनःपूर्वक आभार!
महात्मा बसवेश्वर सोसायटी ही निपाणीतील समाजसेवा व सामाजिक उत्तरदायित्व जपणारी अग्रगण्य संस्था आहे. समाजहिताचे कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणे ही मोठीच प्रेरणादायी गोष्ट आहे.
या सन्मानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि श्री महात्मा बसवेश्वर सोसायटीस त्यांच्या पुढील कार्यासाठी अनंत शुभेच्छा!