???? ????? संचलित
डॉ.सौ.वैशाली & डॉ.विलास पारेख.
?महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.
◁━━━━◈❇️◈━━━━▷
?️शीत शव पेटी
[Single body mortuary freezer] निपाणी व परिसरासाठी उपलब्ध व सेवा सुरु.
महावीर आरोग्य सेवा संघ ने निपाणी भागामध्ये प्रथमच शीत शव पेटी सेवा उपलब्ध केली आहे.
आज बुधवार दि. 31-05-2023 रोजी कुन्नूर गावातील सुसाबाई बंडू खोत यांचे दुःखद निधन झाले. त्यांचा चिरंजिव श्रीनगर येथे मिल्ट्रीमध्ये सेवा बजावत आहे. त्यास येथे येण्यास कमीत कमी 24 तासाचा अवधी लागणार आहे.
या शीत शव पेटीतील तापमान शून्य अंशाच्या खाली असल्याने मृतदेहाची हेळसांड होणार नाही. मृतदेहापासून संसर्ग होत नाही. म्हणून ही शव पेटीची सेवा खोत कुटुंबीयांना महावीर आरोग्य सेवा संघ मार्फत दिली आहे.
कालच ही शवपेटी निपाणी भागासाठी उपलब्ध झाली. व आजपासून त्याची सेवा सुरू झाली.
महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी ही शीत शव पेटी निपाणी परिसरातील सर्वांच्यासाठी उपलब्ध केली आहे तरी आवश्यक नागरिकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.