Menu Close

निपाणी परिसरातील नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य रक्षण शिबिर

निपाणी परिसरातील नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य रक्षण शिबिर.?‍♀*_____________________________
*? महावीर आरोग्य सेवा संघ* व*कृपा डायग्नोस्टिक लॅब* यांचे संयुक्त विद्यमाने निपाणी व निपाणी परिसरातील पोलिस ऑफिसर, पोलिस कर्मचारी वर्ग यांचे संपूर्ण आरोग्य चिकित्सा शिबीर रविवार दि. 5-12-2021 रोजी व्यंकटेश मंदिर निपाणी येथे यशस्वीरित्या पार पडले.         या शिबिर दरम्यान DYSP मनोजकुमार नाईक, CPI सन्मेश शिवयोगी, Town PSI कृष्णवेली C.J., बसवेश्वर चौक पोलीस स्टेशन- आनंद करपट्टी, खडकलाट विभाग लक्ष्मण हरपी तसेच महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी चे अध्यक्ष प्रकाशभाई शहा व उपाध्यक्ष सतीश वखारिया यांचे तर्फे सर्व पोलिसांची आरोग्य उत्तम राहो म्हणून प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात केली.           आरोग्य शिबिर अंतर्गत 170 पोलिसांची आरोग्य तपासणी केली.       या शिबिर मध्ये पन्नास पोलीस अधिकारी वर्गांची E.C.G. केला गेला. जवळपास प्रत्येकी 600 ते 700 रुपये खर्चाच्या 98 पोलिस अधिकाऱ्यांची रक्त तपासणी मोफत केली. तसेच मोफत औषध उपचार करण्यात आला.       संशयित हृदयरोग व मधुमेह पोलीस रुग्णांना पुढील उपचारासाठी सल्ला दिला.           या शिबिरामध्ये निपाणी शहर, ग्रामीण विभाग, खडकलाट-चिकोडी पोलीस ऑफिसर सह महावीर आरोग्य सेवा संघाचे विश्वस्त कृपा डायग्नोस्टिक लॅबचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते