*“डॉक्टर आपल्या दारी”*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे. निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय*“फिरता दवाखाना”*ची सुरुवात केली आहे. शनिवार दि. 11-06-2022 रोजी *गव्हाणी* गावांमध्ये अल्पदरात रुग्णसेवा दिली. *गव्हाणी* मध्ये ह्या दिवशी *100 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला. हा आरोग्य शिबिर यशस्वीपणे व सुयोग्य नियोजनाने पार पाडल्याबद्दल महावीर आरोग्य सेवा संघाचे विश्वस्त रितेश शहा यांचा सत्कार केला. रितेश शाह यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये सुजित स्वामी, सुजल मेहता, राजू मेहता, मिलिंद मेहता, सुगम चव्हाण सर, सागर शहा व यमकरमर्डी (सरपंच) श्रीकांत पाटील सिदगोंडा पाटील व गव्हाणी गावातील नागरिक उपस्थित होते.