*“डॉक्टर आपल्या दारी”*
*महावीर आरोग्य सेवा संघ* (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने
*“डॉक्टर आपल्या दारी”* ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय
*“फिरता दवाखाना”*
ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 09-07-2022 रोजी *पडलिहाळ* गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली.
*पडलिहाळ* मध्ये ह्या दिवशी *70 रुग्णांना रुग्णसेवा* देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.
ह्या सर्व 70 रुग्णांचा संपूर्ण खर्च *श्री समित बाबासाहेब सासणे* ह्यांनी केला.
जितेंद्र शहा यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये अध्यक्ष प्रकाश शहा, उपाध्यक्ष सतिश वखारीया, मिलिंद मेहता, रितेश शहा, प्रतीक शहा, अमित संघवी डॉक्टर्स व स्टाफ मेंबर्स हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी श्री शंकर जाधव, गोविंद जाधव, बाळासाहेब कोरे व पडलिहाळ ग्रामस्थांची मोलाची मदत मिळाली.