*महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.*———————————————-महावीर आरोग्य सेवा संघ तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचे निपाणी येथे विविध रोगावर उपचार व सल्ला शिबिर तज्ञ डॉक्टर्स मार्फत आयोजित केले होते.*नागरिकांची गर्दी:* वेगवेगळ्या रोगावर निदान व उपचाराची सोय या शिबिरास केली होती त्यामुळे निपाणी शहरासह परिसरातील 125 हून अधिक रुग्णांनी हजेरी लावून शिबिराचा लाभ घेतला. मोरया मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर्स मार्फत विविध रुग्णावर उपचार केले. मानवी शरीरामध्ये होणारे आजार एकमेकाचा संयुक्त रोगामुळे उत्पन्न होत असतात. विविध संयुक्त रोगावर या शिबिरामध्ये उपचार व सल्ला मिळाल्याने अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले. महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केला आहे तीन वर्षाचा काळामध्ये दोन लाखांहून अधिक रुग्णांना अल्प मोबदल्यात सेवा दिली आहे. सर्वात मोठा लाभ गरीब कुटुंबांना मिळाला आहे सर्व रुग्णांनी योग्य उपचारासाठी लाभ घ्यावा असे आवाहन मास्क ग्रुपचे *अध्यक्ष प्रकाशभाई शहा* यांनी व्यक्त केले. मोरया मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल चे सर्वेसर्वा MD डॉ. संगीता निंबाळकर,कोल्हापुर ह्यांनी आरोग्य शिबिरामध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून आभार व्यक्त केले. तसेच भविष्यात आपणाकडून अधिक क्षमतेने रुग्ण सेवा घडत राहो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.