Menu Close

Social Contribution of our hospital to car accident people

*अपघात ग्रस्त दांपत्यास महावीर आरोग्य सेवा संघ निपाणी यांचेकडून दाखवली मायेची माणुसकी.*_____________________________ शुक्रवार दि. 17-12-2021 रोजी निपाणी हद्दीत NH-4 हायवेवर सौंदलगा नजीक दोनप्रहरी भरघाव कारचा टायर फुटून भीषण अपघात घडला.       Skoda या चार चाकी वाहनमध्ये दिशा मयंक चंदन (22) व  तनय राजेश शहा (22) हे प्रवासी मुंबई ते गोवा असा प्रवास करीत होते.                Skoda गाडीचा टायर फुटण्याचे निमित्त होऊन गाडी चार वेळा पलटी होऊन दुसऱ्या ट्रॅकवर जावून दुचाकीस्वारास धडकली त्यात तो जागीच ठार झाला. संपूर्ण गाडीचा चक्काचूर होऊन दोघेही गंभीर जखमी झाले.       प्रशासन व पोलिसांना अपघाताची कल्पना येताच PSI अनिल कुंभार त्वरित ऍम्ब्युलन्स मधून सदर जखमींना त्वरित गांधी हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केले.      गांधी हॉस्पिटल मधील डॉ. सीमा गुंजाळ, डॉ. गणेश व स्टाफ मेंबर यांनी आपले सर्व कसब लावून उपचार सुरू केले. पण दिशा मयंक शहा या गंभीर युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तनय राजेश शहा हा युवक उपचारास साथ देत होता.        सदर युवक युवतीच्या कुटुंबातील सदस्य मुंबईतील नामवंत वकील श्री मयन चंदन यांनी महावीर आरोग्य सेवा संघ या संस्थेस थेट संपर्क साधून मदतीची विनंती केली.           तनय शहा या गंभीर जखमीस उपचाराबरोबरच गरज होती ती मानसिक आधाराची.        महावीर आरोग्य सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा, प्रतिक शहा व संस्थेचे काही विश्वस्थ रुग्णवाहिका व ड्रायव्हर राहुल हे सर्वजण त्वरीत गांधी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन आम्ही सर्व आपल्या सेवेसाठी आलो आहोत म्हणून जखमीस मोठा आधार दिला.औषधाबरोबरच दोन घास जेवणाचे पुरविले. CT Scan व उपचारासाठी मदत केली.         त्याच्या नकळत दोन्ही मृतदेहाचे पोस्टमार्टम करवून घेतले. जवळपास रात्री 11:00 वा.दोघांचेही आई-वडील अनोळखी निपाणी गावात दाखल झाले. अपघाताची संपूर्ण कल्पना ध्यानात येताच दुःख अनावरणाने आक्रोश करू लागले. त्यांना धीर देत असताना सर्वांचेच डोळे पाणावले होते.        रात्री 2:30 वा.सर्व शासकीय व पोलीस सोपस्कार पूर्ण करून रुग्णवाहिकेतून सर्वांना मुंबईकडे रवाना केले.      यावेळी साहिल शहा, बंडा घोरपडे, सचिन देशमाने, गांधी हॉस्पिटल व पोलीस कर्मचारी यांची मोलाची मदत अपघातग्रस्त कुटुंबास मिळाली.       कोणतीही ओळख नसताना *”माणसाने माणुसकी दाखवली”* हे न बोलूनही हे त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.